दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बीड ” एक हात मदतीचा ” उपक्रम राबविणार – राजेंद्र लाड

0
222

 

जामखेड न्युज——

दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बीड ” एक हात मदतीचा ” उपक्रम राबविणार – राजेंद्र लाड

शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई – ३२ चा आज १७ वा वर्धापन दिन असून यानिमित्ताने जिल्हा शाखा बीड आज दि. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंतच्या वेळेत सर्व बीड जिल्हा शाखा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष व सर्व जिल्ह्यातील सभासद बंधू – भगिंनी यांनी आपल्या गावातील, शेजारच्या गावातील, आपल्या तालुक्यातील सुशिक्षित – बेरोजगार दिव्यांग बांधव, जेष्ठ दिव्यांग बांधव, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग कर्मचारी यांना ” एक हात मदतीचा ” देवून तन, मन, धनाने सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शासन मान्यता प्राप्त असलेली आपली एकमेव महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई – ३२ असून शासन निर्णय क्रमांक आर. जी. ए. १००३ /रा. म. /५५७ /प्र. क्र. १०८- ०३ / दि.०८/११/२००५ अन्वये आपल्या संघटनेस मान्यता आहे. आज दि. ०८ नोव्हेंबर २००५ रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिगांबर घाडगे पाटील व संस्थापक राज्य सचिव मा. श्री. परमेश्वर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली व अथक परिश्रमातून संघटनेची स्थापना होवून आज रोजी आपल्या संघटनेला १७ वर्ष पूर्ण झालेली आहेत.

या १७ वर्षात अनेक कर्मचारी बांधवांनी राज्यापासून तर तालुक्यापर्यंत संघटनेचे रोपटे मोठे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. या सर्वांच्या योगदानामुळेच आज आपण मोठ्या उत्सहात संघटनेचा १७ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यामध्ये मा. श्री. रविंद्र पाटील, मा. श्री. साईनाथ पवार यांचा ही नामोल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

तरी आजच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हा शाखा जिल्ह्याचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. महादेव सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर ” एक हात मदतीचा ” हा उपक्रम राबवत आहे. असेही शेवटी बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here