जामखेड न्युज——
रावसाहेब रोहोकले गुरुजींनी दिव्यांग शिक्षकांना सतत न्याय देण्याचे काम केले – सुभाष फसले
विजयाचा गुलाल रोहोकले गटाचाच
शिक्षक बँकेच्या व विकास मंडळाच्या निवडणुकीत दिव्यांग शिक्षकांना उमेदवारी देऊन न्याय देण्याचे काम रावसाहेब रोहोकले गुरुजींनी केले आहे, मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील दिव्यांग शिक्षक यांना उमेदवारी दिली होती , यावेळी जामखेडमधून दिव्यांग बांधव नारायण लहाने व कर्जत येथे देवराम लगड यांना उमेदवारी दिली आहे.
राखीव जागा नसताना सर्व साधारण जागेवर दिव्यांगासह इतर देखील सर्व समाजास उमेदवारी दिली ,महीला भगिणींस दोन जागा असताना ५ महिलांना उमेदवारी दिली आहे रोहोकले गुरुजी शाळाशाळा वर फिरताना शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवताना जे शिक्षक भेटतात,ज्या गोष्टी सांगतात त्या सोडवणे, अभ्यास करून त्या राबवणे हाच त्याचा जाहीरनामा असतो, नुसती आश्वासने देण्यापेक्षा ती राबवली पाहिजेत,पुढील काळात दोन टक्के फरकाने बँकेचा कारभार करण्याचे आश्वासन दिले आहे.
विकास मंडळाचे अपूर्ण काम पूर्ण करनार आहेत,त्यामुळे रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ विजयी होणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे, यावेळी,यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे विकास हजारे यांनी सांगितले तालुक्याला दिलेले बँकेचे उमेदवार नारायण लहाने व विकास मंडळाचे उमेदवार वैजीनाथ गीते दोघेही धार्मिक वृत्तीचे सात्विक शिक्षक व सतत शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारे आहेत, त्यामुळे तालुक्यातील सामान्य सभासद हा त्यांचासोबत आहे.
रावसाहेब रोहोकले गुरुजींना मानणारा व त्यांच्या कामावर प्रभावित झालेला खूप मोठा वर्ग येथे आहे, सौ सीमा निकम यांनी संचालिका असतांना बँकेचा पारदर्शी व उत्कृष्ठ कारभार केला ,सभासदांची कसलीही अडवणूक न करता त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले, त्यामुळे आम्ही तालुक्यातून 250 पेक्षा जास्त मतदान निश्चित स्वरूपात देऊ अशी खात्री मुख्याध्यापक अनिल आव्हाड यांनी दिली
यावेळी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र मोहोळकर, दतात्रय कोल्हे, सुभाष सरोदे, दादा राऊत,बाळासाहेब रोडे, सुभाष फसले ,नितेश महारनवर, विजयकुमार रेणुके, रुपेश वाणी, अनिल कुलकर्णी, विठ्ठल पवार, संजय राठोड,नितीन पवार,शर्मिला मोटे,वंदना मोरे,सुनंदा वराट ,भीमा बोरुडे सह आदी शिक्षक तालुका दौऱ्यावर मोठ्या संख्येने होते