गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच व ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीस बिनशर्त जाहीर पाठिंबा- ज्येष्ठ गुरुकुल नेते श्री. संतोष डमाळे जामखेडमध्मे गुरुमाऊली तांबे गट जोमात तर गुरूकुल कोमात

0
182

 

जामखेड न्युज——

गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच व ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीस बिनशर्त जाहीर पाठिंबा- ज्येष्ठ गुरुकुल नेते श्री. संतोष डमाळे

जामखेडमध्मे गुरुमाऊली तांबे गट जोमात तर गुरूकुल कोमात

 

शिक्षक बॅक निवडणूक शेवटच्या टप्प्यात
येत असतानाच जामखेड तालुक्यात गुरूकुल मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी गुरुमाऊली तांबे गटाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे तांबे गट अधिकच मजबूत झाला आहे तर गुरूकुल कोमात गेले आहे.

जिल्ह्याचे नेते अर्जुन शिरसाठ, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत बांगर, ज्येष्ठ नेते रा. का. बडे, श्री संजय चव्हाण उच्च अधिकार समिती यांच्या उपस्थितीत शिक्षक समितीचे जामखेड तालुक्याचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मार्गदर्शक श्री संतोष डमाळे, गुरुकुल मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री राम ढवळे, गुरुकुल मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. अविनाश पवार, सांस्कृतिक गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष श्री नामदेव खलसे, शिक्षक समितीचे सरचिटणीस श्री आजिनाथ पालवे, गुरुकुल सांस्कृतिक समितीचे सरचिटणीस श्री विजय जेधे, गुरुकुल मंडळाचे कोषाध्यक्ष श्री संतोष वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बळीराम अवसरे, गुरुकुल डी सी पी एस तालुका अध्यक्ष श्री नानासाहेब बांगर, श्री. विठ्ठल गंभीरे, श्री लक्ष्मण वटाणे, श्री मारुती फड, श्रीमती जगताप मॅडम, श्रीमती उनवणे मॅडम, श्रीमती डमाळे मॅडम या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुरुमाऊली मंडळ 2015 शिक्षक एकल मंचक मंडळ व शिक्षक भरती आघाडीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते श्री संतोष डमाळे यांनी बँकेच्या कारभारा अतिशय उत्कृष्ट सुरू असून सभासद हित या आघाडीने जोपासले आहे त्यामुळे आम्ही बिनशर्त जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत असे मत व्यक्त केले. यावेळी या सर्वांचे जिल्हा नेते माझी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक श्री अर्जुनराव शिरसाठ, ऐक मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णुपंत बांगर, ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक रा. का. बडे यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना अर्जुन राव शिरसाठ यांनी विद्यमान संचालक बॉडीने सभासदांना निर्णय घेऊन सभासदांचे हित जोपासले आहे. त्यामुळे सर्वसामान्य सभासद गुरुमाऊली मंडळ, शिक्षक एकलमंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भरती आघाडीकडे दिवसेंदिवस पाठिंबा देत आहे. जिल्हा नेते माननीय बापूसाहेब तांबे व राजकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्वसामान्य सभासदांच्या विचारातून बँकेचे कामकाज पाहिले जात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आपल्या काम धेनूचा विकास साधण्यासाठी व सर्वसामान्य सभासदांचे हीच जोपासण्यासाठी वेगवेगळ्या योजना सभासदांच्या योग्य सुचनेतून, आमसभेच्या माध्यमातुन राबविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली व गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीला प्रचंड मतांनी सभासदांनी छत्री फुलीवर शिक्का मारून विजयी करावे असे आवाहन केले

यावेळी राज्य नेते किसनराव वराट, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री दिगंबर पवार, विकास मंडळाचे विश्वस्त श्री गोकुळ गायकवाड, जिल्हा नेते व मार्गदर्शक श्री केशव गायकवाड, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष श्री जालिंदर भोगल, जिल्हा उपाध्यक्ष श्री विनोद सोनवणे, उच्च अधिकार समितीचे उपाध्यक्ष श्री माजीद शेख, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य श्री विकास बगाडे, जामखेड तालुक्याचे शिक्षक बँकेचे उमेदवार श्री संतोषकुमार किसन राऊत व विकास मंडळाचे उमेदवार श्री मुकुंदराज दशरथ सातपुते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री एकनाथ (दादा) चव्हाण, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग लक्ष्मण मोहळकर, तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री रामहरी बांगर, तालुका उपाध्यक्ष श्री नानासाहेब मोरे, तालुका उपाध्यक्ष श्री सुधीर कांबळे, प्रसिद्धीप्रमुख श्री राजू मडके हे उपस्थित होते.

 

जामखेड न्युजशी बोलताना गुरूकुल मंडळाचे जामखेड अध्यक्ष राम ढवळे म्हणाले की, गुरूकुल ने तिकीट वाटप करताना निष्ठवानांना डावलले आहे तसेच कोणालाही विश्वासात न घेता चुकीचे तिकीट वाटप केले आहे त्यामुळे आम्ही या निवडणुकीत तांबे गटाबरोबर आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here