जमादारवाडी येथील युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!! 

0
295

जामखेड प्रतिनिधी

       जामखेड न्युज——

जमादारवाडी येथील युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!! 

जमादारवाडी येथील युवकांचा नगरपरिषद हद्दीत बटेवाडी येथे लाईट चे काम करत असताना करंट बसुन पोलवरून खाली पडून मृत्यू झाला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अविनाश ( बालाजी) मारूती आजबे वय 29 हा
नगरपरिषदेच्या स्टेट लाईट ठेकेदाराकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे आज गुरूवार दि. ६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषद हद्दीत बटेवाडी येथे लाईटचे काम करत असताना एलईडी बल्ब बदलत असताना करंट बसल्याने पोलवरून खाली पडला यामुळे तोंडाला मार लागून पाय मोडला परिसरातील लोकांनी खाजगी वाहनांनी ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी मृत घोषित केले यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हळहळ व्यक्त केली जात आहे.

यावेळी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष डॉ. अँड. अरूण जाधव, पांडूराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मंगेश आजबे, प्रदिप टाफरे, विजय (टिल्लू ) राळेभात, ऋषिकेश बांभरसे, आकाश डोके, हितेश वीर, शहाजी राळेभात, विकास राळेभात, अॅड हर्षल डोके, प्रकाश काळे, हरिभाऊ आजबे, पत्रकार अशोक वीर, अनिल बाबर, नितीन मुरूमकर, रामेश्वर नेटके सह अनेक जण उपस्थित होते. 

या अगोदरही दोन घटना घडल्या आहेत दत्तात्रय वीर व हुसेन शेख यांनाही लाईटचे काम करत असताना अपंगत्व आलेले आहे. दोघांना कसलीही शासकीय मदत मिळालेली नाही. 

घटनेची खबर हरिभाऊ आजबे यांनी दिली.

नातेवाईक ,मित्र परिवार तसेच काही माजी नगरसेवकांनी आगोदर कर्मचारी वीमा दाखवा नंतर शवविच्छेदन करा अशी मागणी केली होती त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालय येऊन गर्दी हटवली तसेच संबंधित कंपनीकडे वीमा काॅफी पाठवण्यासाठी मागणी केली. 

त्याच्या मागे आई वडील एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 

 

चौकट

डॉ. अँड. अरूण जाधव नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष यांनी जामखेड न्यूजशी बोलताना सांगितले की, नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाचा विमा उतरवला पाहिजे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य पुरविणे गरजेचे आहे. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ताबडतोब शासकीय योजनेतून आर्थिक मदत मिळावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here