जयभवानी तरूण मंडळाच्या पायी ज्योतीचे डॉ. भगवानराव मुरुमकर मित्रमंडळाच्या वतीने स्वागत!!!

0
142

जामखेड न्युज——

जयभवानी तरूण मंडळाच्या पायी ज्योतीचे डॉ. भगवानराव मुरुमकर मित्रमंडळाच्या वतीने स्वागत!!!

पिंपळवाडी येथील जयभवानी तरुण मंडळ सभापती भगवान दादा मुरुमकर मित्र मंडळाने तुळजापूर येथुन आणलेल्या पायी ज्योतीचे खर्डा चौकात स्वागत करताना सभापती भगवान दादा मुरुमकर शरद दादा कार्ले व इतर मान्यवर उपस्थित होते.

साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, कडभनवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री. क्षेत्र तुळजापूर ते पिंपळवाडी साकत या पायी ज्योतीचे स्वागत माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांच्या वतीने वाजत गाजत स्वागत खर्डा चौक येथे करण्यात आले तसेच देवी भक्तांना फळाचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ. भगवानराव मुरुमकर, शरद कार्ले, दिलीप घोलप, महारुद्र नेमाने, शंकर घोलप,
उद्धव हुलगुंडे, माऊली नेमाने, राहुल घोलप, अनिकेत घोलप, सचिन मोहिते, टेकाळे, यांच्या सह पिंपळवाडी येथील जयभवानी तरूण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पायी ज्योती मध्ये साकत पिंपळवंडी कोल्हेवाडी येथील युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. नवरात्रात उत्साहा निमित्ताने निघालेल्या या पायी ज्योतीचे विसावे वर्षे होते.अशी माहिती डॉ. मुरूमकर यांनी दिली. या नंतर ही पायी ज्योत वाजत गाजत खर्डा चौक येथून बीड रोड साकत फाटा मार्गे पिंपळवाडी याठिकाणी मार्गस्थ झाली. दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने भाविक भक्त देविचा उत्सव साजरा करतात.

डॉ. भगवानराव मुरुमकर दरवर्षी नवरात्र उत्सवात तरूण मंडळांना टि शर्ट चे वाटप करतात.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here