सामाजिक जाणिवेतून अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणाऱ्या डॉ. शिंदे दांपत्याचे सामाजिक व शैक्षणिक कार्य उल्लेखनीय -आमदार रोहित पवार

0
185

जामखेड न्युज——

सामाजिक जाणिवेतून अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणाऱ्या डॉ. शिंदे दांपत्याचे सामाजिक व शैक्षणिक कार्य उल्लेखनीय -आमदार रोहित पवार

डॉ सागर शिंदे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य उत्कृष्ट – आमदार रोहित पवार

अनाथ अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून डॉ सागर शिंदे यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार अंगीकृत करून डॉ सागर शिंदे व डॉ मयूरी शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले त्यांचे हे कार्य उत्कृष्ट व कौतुकास्पद आहे. ते रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. व जामखेड मध्ये प्रसिद्ध डेंटल डॉक्टर म्हणून कार्य करत आहेत.

असे मत रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त आमदार रोहित पवार यांनी मांडले. तसेच अकरा अनाथ विद्यार्थ्यांना आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले व वार्षिक फीचा चेक विद्यालयाकडे सुपुत्र करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित (दादा) पवार,र.शि.सं. उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे, नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, रा काँ प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी, भोसले एम के ,कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, रा काँ तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ वारे, डॉ सागर शिंदे, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के. डी. आदी मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

डॉक्टर सागर शिंदे व मयुरी शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील सण 2022-23 मधील ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत अशा अनाथ अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले आहे.

डॉक्टर सागर शिंदे हे मागील सहा वर्षा पासून नागेश विद्यालयायील अनेक अनाथ विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतात आत्तापर्यंत त्यांनी ८४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले आहे. यामध्ये ते शैक्षणिक सर्व वार्षिक फी, शालेय संपूर्ण गणवेश ,दप्तर वही ,चित्रकला वही- साहित्य ,कंपास पेटी , व शाळेला लागणारे सर्व साहित्य तसेच एसएससी बोर्ड फी असा सर्व खर्च अनाथ विद्यार्थ्यांसाठी करत आहे.

तसेच कोविड संसर्ग काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी नागेश विद्यालय पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना कापडी मास्क वाटप केले आहेत.

डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे

त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
समाजाचे आपले काहीतरी देणे लागते म्हणून सामाजिक बांधिलकी जपत असे कार्य करत आहोत असे मत डॉ सागर शिंदे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here