कुस्तीत महाराष्ट्रला सुवर्णपदक मिळवून जामखेडचे नाव उंचविणाऱ्या पै. सुजय तनपुरेचा आमदार राम शिंदे यांच्या वतीने सत्कार

0
209

जामखेड न्युज——

हरियाणा येथील नॅशनल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून कुस्तीत जामखेडचे नाव उंचाविणाऱ्या पै. सुजय तनपुरेचा आमदार राम शिंदे यांच्या वतीने सत्कार

हरियाणा येथे झालेल्या नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये शिऊर ता.जामखेड तालुक्यातील युवा मल्ल पै.सुजय नागनाथ तनपुरे याने ६८ कि ग्रॅ वजन गटात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच इथून पुढच्या काळात लागणारी आवश्यक मदत देखील करण्याचे आश्वासन दिले.

 

त्या प्रसंगी उपस्थित भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, बोर्लाचे उपसरपंच तथा सेवा सेवा सोसायटीचे चेअरमन जालिंदर चव्हान, शिऊर उपसरपंच वस्ताद विठ्ठल देवकाते, पांडुरंग उबाळे, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हरियाणा (रोहतक) या ठिकाणी झालेल्या U15 नॅशनल कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ तालमीचा चपळ चित्ता पैलवान सुजय तनपुरे याने 68KG FS वजन गटामध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदकाची कमाई करून दिली होती. यामुळे जामखेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले.

पैलवान सुजय ने पहिल्या कुस्तीमध्ये पंजाबच्या दिपक सिंग या मल्ला वरती 10-0 असा विजय मिळवला. नंतर कोर्टर फायनल च्या कुस्तीमध्ये उत्तर प्रदेशच्या विकेश यादव यावरती 9-2 सा विजय मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, सेमी फायनल मध्ये दिल्लीच्या निशांत रोहील वरती 3-1 असा विजय मिळवला व फायनल मध्ये प्रवेश केला, फायनल कुस्ती मध्ये हरियाणाच्या यश सोबत चिटपटीने विजय मिळवत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here