नगरचे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी पायी मुंबईच्या दिशेने रवाना!! ठाकरे व शिंदे गटाची जोरदार तयारी

0
169

जामखेड न्युज——

नगरचे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी पायी मुंबईच्या दिशेने रवाना!!

ठाकरे व शिंदे गटाची जोरदार तयारी

दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास; 250 हून अधिक शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अहमदनगरचे अनेक शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत.

गेले काही दिवस दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं. शिंदे गट आणि शिवसेना दोघांनाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने (BMC) परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने महापालिकेच्या या निर्णयाविरोधात हाय कोर्टात (High Court) याचिका दाखल केली. न्यायालयाने शिवसेनेला (Shiv Sena) दिलासा देत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव घेेण्याची परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. गेले दोन वर्ष शिवसैनिकांना कोरोनामुळे दसरा मेळाव्यात सहभागी होता आले नाही, मात्र यंदा शिवसैनिक दसरा मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांची पायी वारी
शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अहमदनगरचे अनेक शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत.

250 हून अधिक शिवसैनिक अहमदनगरहून मुंबईच्या दिशेने दसरा मेळाव्यासाठी निघाले आहेत. या शिवसैनिकांंमध्ये जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, नागरसेवक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला देखील यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत. हे शिवसैनिक मेळ्याव्याच्या दिवशी मुंबईत दाखल होणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here