जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांनी खड्यांना आवाहन द्यावे -डॉ.भगवानराव मुरूमकर
“आमदार प्रा. राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.”
“विधानसभेचा राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लागत नसते आमदार रोहित पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा”
“रोहित पवार विधानसभेचे आमदार आहेत त्यांनीच आगोदर राजीनामा द्यावा”
“विधानसभेचा राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लागत नसते तेव्हा आमदार रोहित पवारांनी राजीनामा द्यावा ”
“निवडणूकीसाठी आम्ही कधीही तयार आहोत- डॉ. भगवानराव मुरूमकर”
जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवारांनी प्रा. राम शिंदे यांना आवाहन देण्यापेक्षा परिसरातील खड्यांना आवाहन द्यावे कारण जामखेड शहरात तसेच चिंचपूर ते जामखेड रस्ता राहिलेला नाही. पंधरा दिवसांत पन्नास अपघात झाले आहेत कोणाचे हात कोणाचा पाय तर कुणी जीवाला मुकले आहे. शहरातही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. याकडे आमदार रोहित पवारांचे साफ दुर्लक्ष आहे. तेव्हा पवारांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना आवाहन देण्यापेक्षा परिसरातील खड्यांना आवाहन द्यावे असे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी रोहित पवारांना आवाहन दिले आहे.
“काय म्हणाले होते आमदार रोहित पवार”
रोहित पवार म्हणाले कि, राम शिंदे यांनी आजच राजीनामा द्यावा, मी सुद्धा उद्या राजीनामा देतो, प्रचाराला देखील जात नाही. आणि जनतेच्या प्रेमावर निवडून येतो, असं थेट आव्हान रोहित पवारांनी राम शिंदेंना दिले होते.
आमदार रोहित पवारांच्या आव्हानाला उत्तर देताना
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की, आमदार प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट रोहित पवार हेच जनतेतून निवडून आलेले आमदार आहेत तेव्हा आगोदर आमदार रोहित पवारांनी राजीनामा द्यावा मग दुध का दुध आणी पाणी का पाणी होऊन द्यावे कर्जत जामखेड तालुक्यातील जनताच ठरवेल कोणी काय केले किती विकास केला.
सध्या जामखेड शहरात येणाऱ्या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे च खड्डे झाले आहेत. याकडे आमदार रोहित पवारांचे पुर्णतः दुर्लक्ष आहे. त्यांनी खड्यांना आवाहन द्यावे खड्ड्यावरील लक्ष हटविण्यासाठी आमदार रोहित पवार राजकीय वक्तव्य करीत लोकांची दिशाभूल करीत आहेत. निवडणूकीसाठी भाजपा कधीही तयार आहे. कधीही निवडणूक होऊ द्याअसे डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी म्हटले आहे.