जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
आई-वडिलानंतर आपल्याला घडविण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या शिक्षकांचा असतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव आणि आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे स्थान लक्षात राहावे यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व. एम. ई भोरे ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्या जोगदंड बोलत होत्या
याप्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड ( भोरे) मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.बहिर सर , संचालक तेजस भोरे , प्रा. भोंडवे सर, प्रा. डिसले सर,प्रा. दादासाहेब मोहिते सर, प्रा. कसाब सर , प्रा. कदम सर व शाळेतील विध्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्या भोरे म्हणाल्या की, आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात शिक्षकांचा वाटा खुपच महत्त्वाचा असतो शिक्षकाचा सर्वात मोठा सन्मान म्हणजे आपले विद्यार्थी उच्च पदावर जाणे हाच असतो. शिक्षक हाच खरा राष्ट्राचा शिल्पकार आहे.