जामखेड मध्ये राष्ट्रीय छात्र सेना(Ncc) आर्मी भरती उत्साहात संपन्न

0
242
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज——
   NCC 17 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत जामखेड येथे  जामखेड महाविद्यालय, ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड व  रयतेचे नागेश विद्यालय जामखेड साठी राष्ट्रीय छात्र सेनेची भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाली. 
       या भरतीसाठी अहमदनगर 17 महाराष्ट्र बटालियन चे  सुभेदार रमेश चंद्रासिंग, हवालदार दिनेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांच्या सहकार्याने भारती यशस्वी संपन्न झाली. 
        भरतीसाठी प्राचार्य सुनील नरके, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य मडके बी. के., यांचे विशेष सहकार्य लाभले   भरतीमध्ये  मैदानी शारीरिक चाचणी लेखी चाचणी संपन्न झाली.
भरतीमध्ये जामखेड परिसरातील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात भरती प्रक्रिया पूर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here