स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नविन मराठी शाळेत माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

0
176
जामखेड न्युज——
    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नविन मराठी शाळेत माजी सैनिक माणिकराव देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेत ध्वजारोहणानंतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 
   आज दिनांक १५/०८/२०२२ रोजी नवीन मराठी शाळा या ठिकाणी आपल्या भारत देशाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.याप्रसंगी फक्राबाद येथील माजी सैनिक मा.श्री.माणिकराव देशपांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. 
     तसेच लोकमान्य टिळक भाषण व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. राजेंद्र काका देशपांडे, कोषाध्यक्ष मा. श्री. उमेश काका देशमुख, संचालक मा.श्री.डॉ.प्रकाश खैरनार, मा.श्री. बंडोपंत पवार,मा. श्री. नंदुकाका देशमुख,मा. श्री. लक्ष्मीकांत देशमुख सर हजर होते.
यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी तथा संस्थेचे संचालक मा. श्री. लक्ष्मीकांत देशमुख साहेब यांनी शाळेला 10 व्हाइट बोर्ड दिले तर इयत्ता १ ली मधील आर्यन संकेत पवार या विद्यार्थ्यांने शाळेसाठी २ फॅन दिले ,इयत्ता ३ री मधील शिवम नवनाथ राऊत याने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेस 1000 रूपये दिले.यावेळी प्रमुख पाहुणे यांनी मुलांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पालक,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हजारे सर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मीना राळेभात मॅडम यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here