जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
दि.15 ऑगस्ट रोजी देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला शहरात देखील आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 100 फुट उंचीवर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
जिथे ध्वजारोहण झाले तेथे बाजुला दि.14 एप्रिल 2021 रोजी संविधान स्तंभ उभारण्यात आला होता व याच दिवशी संविधान चौक अशी नामकरणाची तोंडी घोषणा करण्यात होती परंतू अधिकृत रित्या नामफलक नव्हते.
आज दि.15 ऑगस्ट रोजी सदर ठिकाणी संविधान चौक नामफलकाचे उदघाटन लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक,माजी नगराध्यक्ष विकास राळेभात
नगरसेवक अर्शद शेख, भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड,राजेंद्र सदाफुले,माजी संचालक सागर सदाफुले,दादा घायतडक,रंजन मेघडंबर,मुकुंद घायतडक,रवी सोनवणे,दिनेश घायतडक,सचिन सदाफुले सह आदी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते