स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी सुनंदाताई पवार यांनी नगरपरिषदेला दिले साडेपाच हजार झाडे

0
232
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
जामखेड शहराच्या स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी बारामती अँग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथून आणलेले विविध प्रकारचे साडेपाच हजार झाडे नगरपरिषदेला सपुर्त केले. सदर झाडे लावले तर वाया जाणार नाही यासाठी खबरदारी घेण्यासाठी प्लॅन तयार केला आहे केवळ फोटोसेशनसाठी झाडे लावली जाणार नाहीत तर ती जगली पाहिजे यासाठी रजिस्टर केले असून कोणी काय केले याचे मूल्यमापन केले जाणार असून झाडे जगली तर स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड होणार आहे असे सुनंदाताई पवार यांनी सांगितले.
आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अभियानात जामखेड शहराचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक आणण्यासाठी स्वच्छता अभियान मोहिम लोकचळवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते रमेश
( दादा) आजबे यांनी स्वच्छता अभियान लोकचळवळ बनवली व प्रभाग वीस व प्रभाग पाच चकाचक केले गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज 250 नागरिक दररोज सकाळी दोन तास श्रमदान करतात यामुळे स्वच्छता लोकचळवळ बनवली आहे.
   नगरपरिषद निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे त्यामुळे अनेक इच्छुक असलेल्यांनी व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविले आहे.
     शहरातील स्वच्छते बरोबर निसर्गाचा समतोल राखला जावा यादृष्टीने सुनंदाताई पवार यांनी हैदराबाद येथून साडेपाच हजार विविध प्रकारचे झाडे मागीतली शनिवार दि. ६ रोजी डॉ. अरोळे हॉस्पिटल येथे अयोजीत कार्यक्रमात त्यांनी सदर झाडे नगरपरिषद व कार्यकर्ते यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना सुनंदाताई म्हणाल्या एकही झाड वाया जाणार नाही याची खबरदारी प्रशासन व कार्यकर्ते यांनी दखल घ्यावी तुम्ही झाडे घाईगर्दीत लावू नका तयारी करा खड्डे घ्या आणलेले माती व खत टाका मंग झाडे लावा व त्याला जाळी लावा सध्या उष्णता वाढत आहे हलगर्जीपणा करू नका फोटोसेशनसाठी झाडे लावू नका ही झाडे आपल्याला जपायची आहे. पुढचा आणखी स्टॉक येईपर्यंत ही झाडे जगवायची आहे. कोविड काळात डॉ. अरोळे हॉस्पिटलने रात्रभर जागून रुग्णांचे प्राण वाचवले व मृत्यूदर कमी केला त्यांचे ऋण आपण विसरणार नाही. या प्रकल्पात सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी
 स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला आहे मागेही आमदार रोहित पवार यांनीही स्वतः या ठिकाणी स्वच्छता केली होती कार्यकर्त्यांसह श्रमदान केले होते. झाडे कोणी लावले, ते सुरक्षित आहे का ती जगवली की नाही याबाबत स्वतंत्र रजिस्टर केले जाणार आहे व मूल्यमापन केले जाणार आहे.
जामखेडकरांना भरपूर आँक्सीजन मिळावा, सावली मिळावी व पर्यावरणाचा समतोल राखला जावा शहर हिरवाईने नटावे याकरिता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व लोकवस्ती मध्ये झाडे लावण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्लॅन २२ हजार केला आहे प्रत्येक झाडाला लोखंडी जाळी व नगरपरिषदेचे दोन टॅकरने पाणी दिले जाणार आहे. शहरातील नागरिकांना पालीकेला झाडे देण्याचे आवाहन जनजागृतीद्वारे केले होते. यासाठी काही नागरिकांनी वाढदिवसाचे औचित्य साधून वनौषधीचे झाडे मिळाली परंतु ते प्रमाण अत्यल्प होते. आता मात्र सुनंदाताईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाडे उपलब्ध झालेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here