जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – – (सुदाम वराट)
शिक्षण क्षेत्रात इ – साहित्याच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करणारे शिक्षक रवी भापकर यांची राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा योजना शिफारस करण्यासाठी राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा सुपर 30 विचारगट स्थापन केला असून त्यामध्ये राज्याचे शिक्षण सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
रवि भापकर हे जामखेड तालुक्यातील जि.प.शाळा सरदवाड़ी येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे व्हावे म्हणून त्यांनी विविध ई सहित्याची निर्मिती केली आहे. त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी स्वतः शैक्षणिक वेबसाइट तयार केली असून आपण ती www.ravibhapkar.in या वेब अड्रेस वर पाहू शकतो. या वेब च्या माध्यमातून आपण कथा, कविता, पाठ्यपुस्तके, ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, विविध apps मोफत डाउनलोड करू शकतो. राज्यातील लाखो शिक्षक व विद्यार्थी या वेब चा नियमित वापर करतात. आजपर्यन्त या वेब ला 30 लाख पेक्षा जास्त भेटी झाल्या असून इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होत असलेली ही राज्यातील क्रमांक एक ची शैक्षणिक वेब आहे. वेब बरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध Android Apps तयार केली असून राज्यातील लाखो विद्यार्थी त्याचा वापर करतात.त्यांनी तयार केलेल्या विविध इयतांच्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन टेस्ट विद्यार्थी मोठ्या आवडीने सोडवितात.
शाळेत त्यांनी इंटरएक्टिव बोर्ड बसवले असून विद्यार्थी अत्याधुनिक शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना इंटरएक्टिव बोर्ड साठी अमेरिकेतून मदत मिळाली आहे. तसेच माजी पालकमंत्री राम शिंदे तसेच विद्यमान आमदार रोहित पवार यांनीही शाळेसाठी इ साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. शाळेसाठी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य असून लोकसहभागातुन लाखो रुपयांची मदत मिळाली आहे.
भापकर राज्य तसेच देश पातळी वर तंत्रस्नेही म्हणून मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यन्त भोपाळ(मध्य प्रदेश ) अजमेर (राजस्थान) ,दिल्ली या ठिकाणी तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभाग नोंदविलेला आहे. तसेच ,मुम्बई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपुर आदि जवळपास 100 ठिकाणी तंत्रस्नेही कार्यशाळा घेवून शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी लावली आहे.
नगर जिल्ह्यातील 60 शाळांचा विदेशातील अनिवासी भारतियांशी ग्लोबल नगरी व्डिहिओकॉन्फरंसिंग कार्यक्रमाच्या द्वारा संवाद घडवून आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1 में रोजी मुंबई येथे झालेल्या Transform Maharashtra या कार्यक्रमात त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेवून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. यापुर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा मॅडम आदींनी त्यांचा गौरव केला आहे.
सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. यात ग्रामीण भागातील मुले मागे राहू नयेत म्हणून भापकर गुरूजी यांनी वेगवेगळे अॅप तयार करून डिजिटल क्लास द्वारे चिमुकल्यानी शिक्षण देत आहेत. यांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग देशातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे होणार आहे.