जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
गेल्या १५ दिवसापासून जामखेड शहरातील तरुण स्वच्छतेचा कामासाठी स्वयंप्रेरणेने सरसावले असून दररोज सकाळी श्रमदानासाठी पुढे येत आहेत. यामध्ये व्यापारी, कर्मचारी, युवक संघटना, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे दहा-बारा वर्षाच्या चिमुरड्यांनीही सहभागी होऊन स्वच्छतेचा जागर सुरू ठेवला आहे. स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी स्वच्छता हि लोकचळवळ बनवली आहे. आमदार रोहित पवार यांच्या स्वप्नातील जामखेड मध्ये स्वच्छतेची नवी पहाट उगवली आहे. या सर्वांना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची साथ मिळते आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी प्रभाग वीस व प्रभाग पाच मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना एकत्र घेत दोन्ही प्रभाग स्वच्छ व चकाचक केला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, आरोळेवस्ती, पोकळे वस्ती, नगर रोड हा परिसर स्वच्छ केला आहे. या भागात पसरलेल्या दुर्गंधीचे साम्राज्य सर्वांनी हटवून स्वच्छ केले.
शहराच्या स्वच्छतेकरिता गेली १५ दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, दिपक घोडके, अशोक हिंगणे, माऊली खांडवे, गणेश खांडवे, ऋषी आजबे, अनिल आजबे, अशोक पोटफोडे, अंबादास चव्हाण, दादा ढवळे, गणेश साळुंके, पप्पू साळुंके, चंद्रकांत आजबे, धनंजय कसाब, अमोल डाडर, रणजित मुंडे, विष्णू काळदाते, गणेश कोल्हे, महादेव कोल्हे, पप्पू कोल्हे यांचा समावेश राहिला.

दहा वर्षे वयोगटातील सुजन डाडर, आयन शेख, साजेब शेख, आदित्य बोराडे, साहिल आत्तार या चिमुरड्यांनीही श्रमदानाचे योगदान दिले. पंधरा दिवसांपासून भल्या पहाटे ही लहान मुलं उठतात आणि श्रमदानासाठी ज्याठिकाणी नागरिक एकवटलेले आहे. त्याठिकाणी जावून योगदान देतात. त्यांच्या या उपक्रमातील सहभागाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे जामखेड शहरात स्वच्छतेची नवी पहाट उगवली आहे.
श्रमदानासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस निवडणूक शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदराज सातपुते, संतोष राऊत, पांडूरंग मोहळकर, शिरीष बरटक्के यांच्यासह शिक्षक बांधवांनी श्रमदान केले. तसेच पुढील काळात आठवड्यातील एक दिवस श्रमदान करण्याचे ठरले. याकरिता रविवार निवडला.
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छ माझं घर, स्वच्छ माझं आंगण’ या स्पर्धेत
विठ्ठल वराट यांनी प्रथम क्रमांक मिळवून प्रेरणा घेतली आणि स्वतःला स्वच्छतेचा कामासाठी वाहून घेतले. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू त्यांनी तयार केले आहेत. त्यांनी फाटक्या टिशर्ट पासून बनविलेले झाडू चांगलेच चर्चेत आले आहेत.
कोल्हे मळ्यातील युवकांनी ही स्वच्छतेचा या अभियानात स्वतःला झोकून दिले. जिद्द,चिकाटी आणि तळमळीने जामखेड शहर स्वच्छ, सुंदर व्हावं; येथील नागरिकांचे आरोग्य चांगल रहावं याकरिता योगदान दिले आहे. ग्रामसेवकही श्रमदानासाठी सरसावले. त्यांनी ही निवडला आठवड्यातील एक दिवस देतात.

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी या स्वच्छतेच्या कामात स्वतः ला झोकुन देत परिसरातील नागरिकांना एकत्र करून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला आहे. रमेश आजबे यांनी आतापर्यंत पदरमोड करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. स्वतःच्या गावाबरोबर मामाचे गावही लोकसहभागातून आदर्श केले बिनविरोध निवडणूका, मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी मुरमीकरण, पेव्हिंग ब्लाॅक, बंदिस्त गटारे, लाईट ची कामे, आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले, ग्रामीण रूग्णालयात बोअरवेल घेतल्याने व मोटार बसविल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली. शहराच्या स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा शहर हिरवाईने नटावे याकरिता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे लावली झाडांना टॅंकरने पाणी घातले व संरक्षक जाळी बसवली त्यामुळे हरित जामखेड होऊ लागले आहे. आता तर प्रभाग वीस व प्रभाग पाच श्रमदानद्वारे चकाचक केला आहे.
शुक्रवार (05) रोजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.मधुकर राळेभात, तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी श्रमदानासाठी योगदान दिले. तसेच आठवड्यातील एक दिवस श्रमदानासाठी देण्याचे जाहीर केले. नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी योगदान देत असल्याने आता हा उपक्रम बदलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून ‘माझी वसुंधरा अभियाना’ अंतर्गत जामखेड शहरात स्वच्छतेचा जागर सुरू आहे. शहरातील नागरिकांच्या प्रबोधनासाठी त्यांनी विविध कार्यक्रम घेतले आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.






