कुंपनानीच खाल्ले शेत, पोलिसांनीच २३ पोते गुटखा केला गायब

0
231
जामखेड न्युज——
 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुटख्याचा कंटेनर पकडायला पाठविलेल्या पोलिसांनीच कंटेनरमधील तब्बल २३ पोते गुटखा पसार केल्याचे केल्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्यासह ३ पोलिसांवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
सविस्तर असे की, बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसर्‍या बाजूला मात्र काही गुटख्या व्यापार्‍यांना काही पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय नुकताच प्रत्यय आला तो बीड जिल्ह्य़ातील पाटोदा येथील कारवाईत. अगदी ४ दिवसापूर्वी पाटोदा परिसरात गुटख्यावर कारवाई करण्यात आली होती. 
वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना गुटख्याच्या कंटेनरची माहिती देऊन तो अडवायला सांगितले होते.  कामगिरीवर पाठवलेल्या पोलीसांनी तो आवडलाही, मात्र कंटेनर अडवल्यानंतर त्यातील ५० पोते गुटख्याऐवजी कारवाईत केवळ २७ पोते दाखविला आणि २३ पोते गुटखा गायब करत येथील हुले कन्स्ट्रक्शन च्या कार्यालयात लपवून ठेवण्यात आला. हि बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबन आदेशातच हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here