सौताडा घाटात वृक्षारोपण!!!

0
186
जामखेड प्रतिनिधी
         जामखेड न्युज——
 जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सौताडा घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी एम जी एस कंपनीचे सचिन गाडे म्हणाले मी गेली बऱ्याच  वर्षापासून पाहत आहे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे नेहमीच आम्हाला मदत करत असतात वृक्षारोपण साठी तर ते सर्वात पुढे असतात तसेच आपघातातील रुग्णांना आणून वाचवण्याचे काम करत असतात काही वेळेस जखमी अवस्थेत हरीण, तरस, मोर, घुबड ,अशा प्राण्यांना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि वन विभाग जामखेड यांच्या संयुक्त येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि वनविभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे वृक्षारोपण करतात आणि त्याचे संगोपनाची जबाबदारी कोठारी करत असतात आत्तापर्यंत त्यांनी हजारो झाडे लावलेली आहेत आणि त्यातील बरेच झाडे जगवली आहेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी सौताडा  आणि मोहा घाट, साकत येथे झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे 
यावेळी  म्हणाले गेली पंचवीस वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य पाहत आहे आम्हाला अभिमान वाटतो कोणत्याही समाजाचा माणूस असला की त्याला ती मदत करतात अपघातातील हजारो लोकांचे प्राण संजय कोठारी यांनी वाचवले आहे ते काही जात पात पाहत नाही स्वतःच्या रुग्णवाहिकेत अपघातातील जखमीला आणून त्याचे प्राण वाचवतात वृक्षारोपण ची  बऱ्याच वर्षापासून ते लक्ष देऊन वृक्षारोपण करतात त्यांनी आत्तापर्यंत हजारो झाडे लावली आहेत आणि त्याच्या संगोपनाची सुद्धा जबाबदारी घेत आहेत त्याबद्दल त्यांचे शब्दात वर्णन करू शकत नाही येत्या १८ जुन पर्यंत  झाडे लावण्याचा संकल्प ही त्यांनी केला आहे  कोठारी यांना सामाजिक कार्यात नेहमी मदत करनारे एम जी एस कंपनीचे सचिन गाडे ,विकास जरे ,दत्ता साळुंखे, गोकुळ जाधव ,प्रकाश मुरूमकर ,सनी सदाफुले ,अमोल वराट, नमित कोठारी आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here