जामखेड न्युज——
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने जामखेड तालुक्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादया दि. २०/०७/२०२२ रोजी तहसिल कार्यालय जामखेड व पंचायत समिती कार्यालय जामखेड येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

तरी ज्या नागरीकांना मतदार यादया पहायच्या असतील त्यांना पंचायत समिती कार्यालय जामखेड व तहसिल कार्यालय जामखेड येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. व ज्यांना मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी दि. २५/०७/२०२२ पर्यंत आपला तक्रार अर्ज तहसिल कार्यालय जामखेड येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावा. दि. २५/०७/२०२२ नंतर आलेला तक्रार अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. याची जामखेड तालूक्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.