कर्जत-जामखेड रस्ता बनला मृत्यूचा सापळा , वाहनचालकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास, जामखेड सातारा बस फसली

0
304
जामखेड न्युज——
   आढळगाव ते जामखेड रस्त्याचे काम सुरू आहे रस्ता मिरजगाव ते जामखेड रस्ता खोदून काही ठिकाणी मुरूम भरला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे हा रस्ता खुपच निसरडीचा आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दररोज कितीतरी मोटारसायकलस्वार घसरतात यात काही जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांचे हात पाय मोडलेले आहेत. आज तर जामखेड सातारा गाडी फसली होती यातील प्रवाशी थोडक्यात बचावले. ताबडतोब  एका बाजूचा रस्ता करावा अशी मागणी जामखेड न्युजशी बोलताना नागरिकांनी केली आहे. 
मराठवाड्याला पुण्या मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे. आता हा मार्ग  राष्ट्रीय महामार्ग ५४८(ड) म्हणुन ओळखला जाईल. या राष्ट्रीय महामार्गाच्या सेक्शन-२ मधील आढळगाव ते जामखेड या ६२.७७५ कि.मी अंतराच्या दुपदरी कामासाठी ४०६ कोटी रुपये अपेक्षित खर्च आराखडा मंजूर झाला आहे. कामही सुरू आहे. मिरजगाव ते जामखेड पंचदेवालय जामखेड पर्यंत रस्ता खोदून काही ठिकाणी मुरूम भरला आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर मुरूम भरलेला नाही सध्या पाऊस संततधार पाऊस असल्याने रस्ता निसरडीचा झाला आहे. वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांचे हात पाय गमवावे लागले आहेत. अनेक वाहने फसतात. 
आज शनिवार दि. १६ रोजी दुपारी जामखेड सातारा बस जामखेड वरून दुपारी एक वाजता गाडी नंबर एम  एच 14 बी टी 3743 चालक सय्यद एस ए तर वाहक मोरे ए आर घेऊन जात असताना दुपारी एक वाजता जवळच म्हेत्रे वस्तीवर साईबन गार्डन प्रवेशद्वारा समोर गाडी फसली यातील प्रवासी थोडक्यात बचावले दररोजच असे अपघात होत आहेत. 
     चौकट
   सततच्या पावसामुळे रस्ता खुपच निसरडा झाला आहे. या रस्त्यावर दररोज अनेक अपघात होतात. अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांचे हात पाय मोडलेले आहेत. ठेकेदाराने ताबडतोब एक पट्टी भरून काढावी त्यामुळे अपघात होणार नाहीत. मिरजगाव, अरणगाव, पाटोदा, रत्नापूर, म्हेत्रे वस्ती परिसरातील लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मी स्वतः या रस्त्यावर गाडी घसरूण पडलो. पाय मोडला एक महिना झाले घरात बसून आहे. असे जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. 
  दत्तात्रय काळे स्थानिक रहिवासी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here