खेमानंद इंग्लिश मेडियम सलग पाचव्या वर्षी १००% निकाल, तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय खेमानंदचेच

0
281
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
जामखेड तालुक्यातील खेमानंद इंग्लिश मेडियम स्कूलचा
दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे तसेच तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक खेमानंदचेच आले आहेत त्यामुळे संचालक मंडळ, प्राचार्य व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
नुकताच जाहीर झालेल्या निकाला मध्ये या शाळेचे विद्यार्थी कु स्नेहल संतोष शिंदे ( ९ ८ % ) गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला
कु. सिद्धी मारुती डमाळ ( ९७ . ८० % ) गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
 कु. कश्यफ अन्सार पठाण ( ९ ६ . ४ ० % ) गुण मिळवून तालूक्यात तृतिय क्रमांक पटकावला आहे .
 या बद्दल विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे . विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार श्री सदाशिवराव लोखंडे, अध्यक्ष डॉ. चेतन लोखंडे, उपाध्यक्ष श्री विजय पवार,  सचिव श्री सतिश शिंदे व  प्राचार्य शिवानंद हालकुडे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here