जामखेड न्युज – – – –
हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकता आले नाही हे शल्य मनात अनेक वर्षे होते, दहावी हा शिक्षणाचा आणि जीवनाचा पाया समजला जातो, दहावीत अनेकांचा पाय घसरतो, अनेक जणांना असंख्य वेळा प्रयत्न करूनदेखील उत्तीर्ण होता येत नाही, डायस प्लॉट झोपडपट्टीतील रहिवासी भास्कर लिंबाजी वाघमारे यांनी तीस वर्षानंतर वयाच्या ४३ व्या वर्षी दहावी ची परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन दाखविली.
१९९२ ला सातवी उत्तीर्ण होते नंतर तीस वर्षानंतर दहावी चा फॉर्म भरून ते ४६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. भास्कर हे टेम्पो चालक आहेत तर त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे तर यंदाच्या दहावी च्या परीक्षेत त्यांचा मुलगा साहिल भास्कर वाघमारे हा अनुत्तीर्ण झाला आहे.
अपयशाला भिडायचं असतं घाबरायचं नसतं पुढील वेळी जोमाने अभ्यास करून उत्तीर्ण हो असा दिलासा देखील त्यांनी आपल्या मुलाला दिला. भास्कर यांच्या कामगिरीने कुटूंबात व परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, भास्कर यांनी लघु चित्रपट कथा लेखन, कलाकार आदी छंद जोपासले आहेत.