Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जीवन साई हाॅस्पिटलमधील मोफत मुळव्याध शिबीरात १२४ रूग्णांवर उपचार

जीवन साई हाॅस्पिटलमधील मोफत मुळव्याध शिबीरात १२४ रूग्णांवर उपचार

0
334
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – – 
शहरातील जीवन साई हाॅस्पिटलमध्ये प्रथमच शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मुळव्याध सर्जन डॉ. प्रदिप तुपेरे ( एम. एस. सर्जन) यांच्या तर्फे मोफत मुळव्याध शिबीरात गरजू रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला यात सुमारे १२४ रूग्णांवर उपचार करण्यात आले तर आॅपरेशन (स्क्लेरोथेरपी) ७० रुग्णांचे करण्यात आले.
   
 जीवन साई हाॅस्पिटलमध्ये सकाळी मुळव्याध शिबीराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बोराडे, जीवन साई हाॅस्पिटलचे संचालक डॉ. सादेख पठाण, डाॅ. भरत देवकर, कौशल्य लॅबचे गोकुळ कोल्हे तसेच हाॅस्पिटल व लॅबचा संपुर्ण स्टाफ उपस्थित होता
   शिबीर यशस्वी करण्यासाठी जीवन साई हाॅस्पिटलचा संपुर्ण स्टाफ, कौशल्य लॅबचा संपुर्ण स्टाफ व मेडिकल स्टाफचे सहकार्य लाभले यामुळेच सव्वाशे रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले तर ७० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
    मुळव्याध व्याधीसाठी  अहमदनगर, मिरज, औरंगाबाद किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही आपल्या जामखेड शहरातच अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मुळव्याध सर्जन डॉ. प्रदिप तुपेरे ( एम. एस. सर्जन) यांच्या तर्फे मोफत मुळव्याध पाईल्सवर इंजेक्शन द्वारे ट्रिटमेंट ( स्क्लेरोथेरपी) शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत मिळाला. दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. हाॅस्पिटल, कौशल्या लॅब व मेडिकलच्या संपुर्ण स्टाफने दिवसभर मेहनत घेत शिबीर यशस्वी केले.
    शिबीर जीवन साई हाॅस्पिटल बस स्टँड जवळ महाराष्ट्र बॅक रोड जामखेड येथे शनिवार दिनांक १८ जून रोजी सकाळी ११ ते ५ पर्यंत होते दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!