जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
धोंडराई ता. गेवराई येथिल उसतोडणी मुकादमाचे उचलीचे पैसे बुडवण्यासाठी मुकादमास पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी येथिल तलावात आणुन बुडवून मारुन खुन केला असल्याची फिर्याद मयत पत्नीच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस काही तासात अटक करण्यात अंमळनेर पोलीसांना यश आले असुन, न्यायालयाने आरोपींना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अंमळनेर पोलिसांनी दिली.
धोंडराई ता. गेवराई येथिल बबन नारायण सुतार, सोनाजी पाचे व अतुल शिंदे, दारु सोडवण्यासाठी पाटोदा तालुक्यातील वरझडी येथे आले होते. डोंगरकिन्ही जवळील भाटेवाडी तलावात ते पोहण्यासाठी उतरले असता. बबन सुतार हा बुडाला हे पाहून दोघे जण पळुन जाताना प्रत्यक्षदर्शींनी पकडुन ठेवले व अंमळनेर पोलिसांना फोन केला. अंमळनेर पो. स्टेशनचे पो. नि. गोरक्ष पालवे व कर्तव्य दक्ष बीट अंमलदार संतोष काकडे, पंकज आघाव, नवनाथ सानप, यांनी तात्काळ भेटदेऊन परिसरातील तरुणांच्या मदतीने सहा तासाच्या अथक परिश्रमातुन प्रेत बाहेर काढले. मयताची पत्नी उषा बबन सुतार यांनी उचलीचे पैसे बुडवण्यासाठी माझ्या नव-याचा पाण्यात बुडवुन खुन केला, अशी फिर्याद दिल्या नंतर आष्टी पोलीस अधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पौलिसांनी आरोपी सोनाजी पाचे राहनार धोंडराई ता. गेवराई व अतुल शिंदे रा आडगाव ता. गेवराई यांच्या विरोधात भादवी कलम ३०२, ३४, ३ अ अँट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबधित आरोपी हे घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेचा तपास करताना अंमळनेर पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे व बीट अंमलदार संतोष काकडे यांचा अनुभव कामी आला आहे.
चौकट-
अंमळनेर पो. नि. गोरक्ष पालवे यांनी योग्य तपास करुन आरोपींना घटनास्थळी च अटक केली आहे. तर संतोष काकडे यांनी आरोपीची मानसिकता पहाता योग्य सुत्रे हलवली. अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्याने तपास स्वतः अभिजित धाराशिवकर हे करत आहेत.