Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जागरण गोंधळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल लोककला

जागरण गोंधळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल लोककला

0
237
जामखेड न्युज – – – – 
खंडेरायाच्या कुलाचारात जागरण, तर देवीच्या कुलाचारात गोंधळ घातला जातो.आपण आज एकविसाव्या शतकात, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असलो, तरी जागरण-गोंधळाची परंपरा इथल्या लोकमानसानं अजून जपली आहे…
जामखेड तालुक्यातील देवदैठण गावातल्या खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला इथल्या लोककलेची अनुभूती घेता आली. जवळा येथील शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टीचे सागर लेकुरवाळे, सुखदेव कसरे, मनोहर खताळ, परशुराम साठे आणि मुरळी सोनाली यांनी या लोककलेची झलक दाखवली.
संबळ आणि डफ वाजू लागला, त्याला तुणतुणं आणि झांजेची साथ लाभली की, आपणही त्या नादकल्लोळात हरवून जातो…
घरात लग्न किंवा मंगल कार्य झालं की जागरण गोंधळ घालत देवीदेवतांचा आशीर्वाद मागत रात्र जागवली जाते. या कार्यक्रमासाठी या मंडळींना १२ ते १५ हजारांची बिदागी मिळते. काळाच्या ओघात जागरण गोंधळ घालणार्‍यांची संख्या कमी होत चालली आहे…लोकसंस्कृतीचा हा अनमोल ठेवा जपायला हवा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!