Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या खळबळजनक बातमी – महिला नायब तहसीलदारांवर कोयत्याने हल्ला महसूल विभागात एकच खळबळ

खळबळजनक बातमी – महिला नायब तहसीलदारांवर कोयत्याने हल्ला महसूल विभागात एकच खळबळ

0
248
जामखेड न्युज – – – – – 
सख्ख्या भावाने कोयत्याने महिला नायब तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील तहसील कार्यालयात आज (दि.६) सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.
आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत बसलेल्या असताना त्यांचा सख्खा भाऊ आला. त्याने गोंधळ घालत अचानक धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, केज पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले असून कोयता जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!