Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कवठेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार समारंभ

देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कवठेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार समारंभ

0
267
जामखेड न्युज – – – – 
 पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील सैनिक बापुराव भगवान कवठेकर हा जवान देशसेवा करून जन्मभूमीत परत आल्याने त्यांचा सेवापुर्ती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटा मध्ये नफरवाडी येथे पार पडला नफरवाडी ग्रामस्थांच्यावतीने भव्यदिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
मा. बापुराव कवटेकर हे भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त झाल्याने नफरवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.बापुराव कवटेकर यांनी अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत आणि कौटुंबिक दुःख सहन करत देशसेवे मध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली.त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईवडीलांचा मृत्यू झाला, कौटुंबिक दुःख सहन करत करत स्वतः ला सावरत त्यांनी स्वतः ला देशसेवेसाठी वाहून घेतले.आणि प्रामाणिक पणे आपले कर्तव्य पार पाडले.त्यांनी 22 वर्ष देशसेवेसाठी खर्ची घातले.आणि आता सेवानिवृत्त झाले. त्यामुळे गावकऱ्यांनाच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक व जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील जेष्ठ नागरिक महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
■ जवानाकडून आई- वडिलाला आपुलकीचे हाक!
लहान वयातच बापुराव कवठेकर यांचे आई- वडील दगावल्याने मायेचा हात फिरवणारी आई नव्हते तर आधार देणारा बाप नव्हता.अशा खडतर परिस्थितीत शिक्षण घेत देशसेवा करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी तो देश सेवेत रुजू झाला आणि आज देशसेवा करून पुन्हा मायदेशी परतला आहे. त्यानिमित्ताने गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन त्याचा भव्य अशी मिरवणूक काढत सत्कार केला यावेळी तो भावूक झाला होता.आणि आई-वडिलांची आठवण त्याच्या चेहऱ्यावर ठळक दिसत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!