जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
खर्डा शहराजवळ असलेल्या व धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनेगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीत सरपंच महेश काळे, चेअरमन तुराब शेख, ईश्वर चव्हाण व उत्तम रसाळ यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला असून पॅनलच्या सर्वच्या सर्व 13 जागा निवडून आल्या आहेत विरोधी अॅड अनिल काळे यांच्या यांचा पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.
सोनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ हे शेजारी धनेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रचंड मताने विजय झाले असून जामखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांची दमदार एंट्री झाली असल्याने यांचा भविष्यात जामखेड तालुक्यातील सहकारातील राजकारणात त्यांचा प्रवेश होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
निवडून आलेले उमेदवार सतीश भोळे, उत्तम रसाळ, तुराब शेख, सचिन गायवळ, दिगंबर बोंद्रे,अण्णा उंबरे, बबन वाळुंजकर, महिंद्र काळे, सौ. गिरजाबाई वाघ, सौ. आशा टिपरे, ईश्वर चव्हाण,बिभीषण निर्मळ, साहेबराव लोहकरे हे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
यावेळी धनेगाव गावातून सर्व विजयी उमेदवारांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली असून येथील प्रती पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले व परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली.
याप्रसंगी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेशकुमार मुंडे यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी शहाजी वाघ यांनी सहकार्य केले.