आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव सोसायटी बिनविरोध

0
197
जामखेड न्युज – – – – – 
     कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोलजी राळेभात साहेब व जामखेड मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर दादा राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक सन २०२२ ते २०२७ सालाकरिता बिनविरोध झाली आहे.
मागील ३० वर्षापासून सावरगाव सोसायटी सहकार महर्षी जगन्नाथ तात्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी  ही मागील ३ वर्षापासून बँक पातळीवर १०० % वसुली होत असून संस्थेस महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ अंतर्गत ७७ सभासदासाठी रक्कम रु ६२ लाख ९४ हजार इतकी कर्जमाफी झालेली आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच काकासाहेव चव्हाण,उपसरपंच सचिन ढवळे,माजी सरपंच अनिल माने,राजेंद्र ढवळे,पोलीस पाटील तुषार चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य महादेव फाळके,मुकुंद सपकाळ,काकासाहेब ढवळे,भास्कर ढवळे,हनुमंत फाळके, चंद्रकांत चव्हाण यांनी सहकार्य केले.
बिनविरोध उमेदवार – दादाहारी थोरात, बाबासाहेब थोरात, भाऊराव थोरात, संगीता सपकाळ, अशोक सपकाळ, मंगल थोरात, बाबासाहेब चिंचकर, दादासाहेब ढवळे, सविता सपकाळ, जयश्री राळेभात,भारत ढवळे, बाळासाहेब गोरे, बबन वाघमारे यांचा समावेश आहे.
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार साहेब, सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात व संचालक अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here