क्षमतेचा वापर केल्यास यश मिळते – प्राचार्य काकासाहेब मोहिते, पहिला जामखेड भूषण पुरस्कार कार्यक्रम संपन्न. प्रा. मधुकर राळेभात व प्रा. घुले यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न

0
271
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – 
 आपल्या प्रत्येकामध्ये प्रचंड क्षमता असते तिचा योग्य वापर केल्यास यश हमखास मिळते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनत उपयोगी पडते. लहानपणी मिळालेली शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडते. पुरस्कारामुळे आपल्या कामावर शिक्कामोर्तब होते असे मत प्राचार्य काकासाहेब मोहिते यांनी व्यक्त केले.
जामखेड येथिल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तालुक्यातील शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, उद्योग, साहित्य, किडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. पहिलाच जामखेड भूषण पुरस्कार शिरुर येथील सी.टी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य व जामखेडचे सुपुत्र श्री. काकासाहेब मोहिते यांना देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच प्रा. मधुकर राळेभात व रामचंद्र घुले यांनी यांचा सेवपुर्ती कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
पहिला जामखेड भूषण पुरस्कार आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांचे शुभहस्ते काकासाहेब मोहिते यांना सपत्नीक
प्रदान करण्यात आला
              कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. काकासाहेब मोहित शिक्षणतज्ञ अ. ल. देशमुख, संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार श्री.राजेश राजेशजी राजेशजी मोरे, अशोक शिंगवी, सुमतीलाल कोठारी, पोलीस उपअधीक्षक काकासाहेब डोळे, सोमनाथ गोपाळघरे, नितीन खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता वारे, सुरेश भोसले, कवी आय. य. पवार, प्राचार्य व्ही सुनील नरके, श्रीकांत होशिंग, विकी घायतडक, बी. के. मडके, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, एस एन पारखे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, श्रीधर जगदाळे, रमेश अडसूळ,  केंद्रप्रमुख किसन वराट, दिगंबर चव्हाण, अमित जाधव सह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना प्राचार्य काकासाहेब मोहिते म्हणाले की, हा पुरस्कार घरचा आहे. आता माझी जबाबदारी आणखीनच वाढली आहे. जामखेड महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करू तसेच प्रत्येकाला शाश्वत विकासासाठी प्रयत्न करावे लागतील. सायन्स व विज्ञान याची सांगड घालून चांगले काम करता येईल. परिसरातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणून परिसराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास निर्माण केला. तसेच नविन शैक्षणिक धोरणात मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारी बदल होणार आहेत यात आपला टिकाव लागला पाहिजे नवनवीन गोष्टी आनंदाने स्विकारल्या पाहिजेत असेही मत त्यांनी व्यक्त केले.
     यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ञ अ. ल. देशमुख म्हणाले की, काकासाहेब मोहिते यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले अस्तित्व निर्माण केले आहे. सत्तर शोधनिबंध यांचे प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील पारितोषिक मिळवणारे व्यक्ती आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत. काकासाहेब हे शिक्षण क्षेत्रातील एकलव्य आहेत. अंगी मोठी नम्रता आहे.
    निवृत्ती दिवशी नेहमीच चांगले बोलले जाते पण प्रा.. मधुकर राळेभात व रामचंद्र घुले दोन्ही माणसे चांगली आहेत. दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे. पुरस्कार मिळवणे सोपे आहे पण पावित्र्य टिकवणे खुप कठिण आहे. पुरस्कार ही एक प्रेरणा आहे. असे मत व्यक्त केले.
  यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले की, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी आमची आई आहे. संस्थेच्या सहकार्याने चांगले काम करता आले. महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. जी चांगले काम करणाऱ्या सर्वाच्या मागे ठामपणे उभे राहते. सुरत चेन्नई रस्ता जामखेड तालुक्यातून जात आहे त्यात जेवढे झाडे तुटतील त्याच्या दुप्पट झाडे लावण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहेत.
  संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी सांगितले की,   कठोर परिश्रम केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. मोहिते सरांनी जामखेडचे नाव मोठे केले आहे.. चिकाटीमुळेच  नावलौकिक झाले आहे.
   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख यांनी सांगितले की, संस्था विस्तार करण्यात प्रा. मधुकर राळेभात यांचे योगदान मोठे आहे. यावेळी प्राचार्य सुनील नरके, प्रा. सुनील पुराणे, रामचंद्र घुले, दत्ता वारे, विद्यार्थिनी शिवगंगा मत्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली
प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल देडे तर आभार रंगनाथ सुपेकर यांनी मानले.
   पहिला जामखेड भूषण पुरस्कार प्राप्त प्राचार्य काकासाहेब मोहिते यांच्याविषयी माहिती
 डॉ. श्री. काकासाहेब मोहिते हे भौतिकशास्त्र हा विषय पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिकवत असून अपारंपारिक उर्जा या विषयामध्ये त्यांनी उल्लेखनीय संशोधन केलेले आहे. त्यांचे आजवर शंभरहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंबलबजावणीसाठी राज्य शासनाने स्थापन केलेले राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदीही त्यांची नुकतीच नेमणूक करण्यात आलेली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य, विद्वतसभा सदस्य, विज्ञान शाखा अधिष्ठाता, दुबई येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राचे संस्थापक संचालक आविष्कार या उपक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनिय काम केलेले आहे. अमेरिकेतील एस. पी. आय. ई. यांच्या वतीने संशोधन पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशनचा सी. व्ही. रामन उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, तंत्रशिक्षण, अपारंपारिक उर्जा व लहान व मध्यम उद्योग या तीन मंत्रालयांच्या वतीने संयुक्तपणे देण्यात येणारा एक्सलन्स इन एज्युकेशन आदि पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
 तसेच त्यांच्या नावावर अपारंपारिक उर्जा क्षेत्रतील तीन पेटेंटही नोंदविण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here