स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संस्था बिनविरोध कशी होईल व समविचारी व्यक्तींना सोबत घेऊन ह्या संस्था टिकवण्यासाठी प्रयत्न चालू असतो. तसाच प्रयत्न पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुर ग्रुप सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आम्ही करत आहोत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शहाशरीफ बाबा शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांचा कुठलाही संबंध नाही अशी माहिती शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे यांनी दिली. ही निवडणूक स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी आज सांगितले की, राज्यभरात शिवसेना भाजपाच्या विरोधात काम करत आहे त्यामुळे या युतीशी माझा कसलाही संबंध नाही.