ऐतिहासिक चौंडी गावाकडे जाणार्‍या मुख्य प्रवेशदवाराचे विद्रूपीकरण थांबवावे – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

0
160
जामखेड न्युज – – – – 
३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी येथे होणाऱ्या जयंती उत्साहाच्या पार्श्वभूमीवर शासकीय व राजकीय पातळीवर नियोजनाची तयारी सुरू असताना कर्जत तालुक्यातून अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक जन्म गावा
चोंडीकडे जाणाऱ्या चापडगाव येथील मुख्य प्रवेशद्वार
 वर्षांनुवर्षे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते प्रवेशद्वार दुरावस्थेत आहे. त्यावर राजकिय जाहिरातींचे बोर्ड लावले जातात. तरी सदर प्रवेशद्वाराच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्यावरील पोस्टर्स हटवावेत व सुशोभीकरण करण्यात यावे
विद्रूपीकरण थांबवावे अशी मागणी जामखेड येथिल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्यावतीने  जामखेड कर्जतचे लोकप्रतिनिधी यांचेकडे करनिवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.
  जामखेड तालुक्यातील चौंडी हे गाव आहिल्यादेवी होळकरांचे ऐतिहासीक जन्म गाव असून हे जामखेड कर्जत चे अहोभाग्य आहे . ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकरांची जयंती भारतभर मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . तसे पाहता आहिल्यादेवी यांनी संपूर्ण भारतभर हिंन्दु देवदेवतांचे मंदिरे हिंन्दु समाजाचे पावित्र्य राखणार्या महादेवाचे बारा जोतिर्लिंग मंदिराचे संपूर्ण काम देवी अहिल्याबाई होळकरांनी केले असून जनतेसाठी नंदीकाठावर घाट , पाणी पिण्यासाठी धरणे , बारावं , सर्व समाजाच्या बांधवानसाठी धर्मशाळा बांधल्या . पण आजपर्यंत सर्व राजकीय नेत्यांनी देवी अहिल्याबाई होळकरांचे व्यासपीठ हे फक्त राजकीय हेतुसाठीच वापरले गेले आहे . परंतु कर्जत तालुक्यातून अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक जन्म गावाकडे जाणारे मुख्य प्रवेशदवार चापडगाव येथे आहे . ते अनेक वर्षांपासून दुरअस्थेत आहे .
 त्यावर राजकिय जाहिरातींचे बोर्ड लावले जातात . तरी जामखेड कर्जत चे लोकप्रतिनिधी यांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की दिनांक ३१ मे २०२२ रोजी अहिल्यादेवी जयंती उत्सवा पूर्वी मुख्य प्रवेशद्वाराचे दुरावस्था थांवबून जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना सुंदर असे प्रवेशद्वार दिसावे व जयंती उत्सवाची शोभा वाढवावी व प्रवेशद्वारावरील राजकीय व इतर बनार , स्टीकर . झेंडे . हटवावेत व पुन्हा हे न व्हावे याची कायमची तजबीज करावी व प्रवेशद्वाराचे शुशोभीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here