लोकप्रतिनिधींच्या आई – वडिलांकडून प्रशासनाचा गैरवापर टाळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा भाजपाचा इशारा

0
460
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
जामखेड तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे विविध खात्यातर्गत स्थानिक लोकप्रतिनिधीचे आई-वडील हे तालुक्यातील अधिकाऱ्याला घेऊन दौरे करतात व त्यांच्या वैयक्तिक संस्थांच्या कमाकारिता फिरवतात हे नियमांना आणि राजशिष्टाचाराला धरून नाही. लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तिच्या कार्यक्रमास प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अथवा यंत्रनेचा वापर करताना आढळूण आल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या बाबत तहसीलदार यांना भाजप पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे विविध खात्यांतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधीचे आई-वडील हे तालुक्यातील अधिकाऱ्याला घेऊन दौरे करतात व त्यांच्या वैयक्तिक संस्थांच्या कमाकारिता फिरवतात हे नियमांना आणि राजशिष्टाचाराला धरून नाही. तालुक्यातील सामन्य जनता व शेतकरी विविध कामांच्या अडचनीच्या माध्यमातून ज्या वेळेस ऑफिसला जातात त्या वेळेस हे अधिकारी तेथे अढळत नाहीत. त्या वेळेस मोठी कुचंबना होते. तसेच शेतकरी व सामान्य जनतेची अडवणुक होते. सदर बाब कोणत्याही नियमांत बसत नाही किंवा असा राजशिष्टाचार देखिल नाही. जामखेड तालुक्यकारिता अधिकृत कृषि केंद्र दहिगांव, ता. नेवासा हे असून, सध्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पुरस्कृत जामखेड तालुक्यमधे कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या कडून कृषि विभागातील अधिकार्‍यांचा व यंत्रनेचा वापर होताना दिसत आहे.
जामखेड पंचायत सामितीचे अधिकारी देखिल लोकप्रतिनिच्या आई व वडिल यांच्या कार्यक्रमास व दौरे यामधे उपस्थित असतात हे कुठल्याही राजशिष्टाचाराला अनुसरून नाही. तरी सबंधित अधिकारी कुठल्याही कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास, त्या अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर शासकीय करवाई करण्यात यावी. तरी लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीच्या कार्यक्रमास प्रशासनातील अधिकाऱ्याचा अथवा यंत्रनेचा वापर करताना आढळूण आल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येइल व त्याच ठिकाणी संबंधित अधिकार्‍यास जाब विचारला जाईल याची पूर्व कल्पना या निवेदानाच्या माध्यमातून देण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पोलिस निरिक्षक, तालुका कृषि अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उप-अभियंता सा.बां.वि., जामखेड यांना देण्यात आल्या आहेत.
   तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देताना पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, कर्जत-जामरवेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे,
भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य
सोमनाथ पाचरणे, प्रविण चोरडीया, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे, आशोक महारनवर, युवा मोर्चा उपाध्यक्ष मोहन गडदे ,शहराध्यक्ष आभिराजे राळेभात, मोहन देवकाते,  बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, टिल्लु पंजाबी, शिवकुमार डोंगरे, अजय सातव, वैभव कार्ले,तुषार बोथरा यांच्या सह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here