सेंन्ट्रल बँक जामखेड शाखेकडून पीएम स्वनिधी व पीक कर्ज वाटप

0
220
जामखेड प्रतिनिधी
     सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाने  साकत, पिंपळवाडी , कोल्हेवाडी, कडभनवाडी, मोहा, लेहेनेवाडी, भुतवडा,  हपटवाडी, रेडेवाडी, बटेवाडी, नानेवाडी गावामध्ये १ एप्रिल ते आज पर्यत ३४७ शेतकऱ्यांना  २ कोटी ५७ लाख पिक कर्ज वाटप केले आहे तसेच पीएम स्वनिधी योजना मार्फत १५० छोट्या व्यावसायिकांना कर्ज दिले आहे.आशी माहिती बँकेचे शाखा प्रबंधक संजय कराड  यांनी दिली
      सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या जामखेड शाखेने १० गावे दत्तक घेतले असून या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप  डिसेंबर महिन्यात २६ शेतकऱ्यांना २६ लाखा कर्ज वाटप केले. तसेच लॉकडाऊनच्या काळात छोटे व्यावसायिकांना रोडच्या कडेला हातगाडी लावून फळे , फुले, चाहाची गाडी आदी व्यवसायांना  फार फटका बसला त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करण्यासाठी  सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली. या योजने मार्फत १५०  व्यवसायकांला दीड लाख कर्ज वाटप केले .
         राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत  बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने यंदा  शेत पीक कर्जाची मागणी ही मोठी होती. असे असतांना देखील  त्यासाठी बँकेतील उपशाखा अधिकारी अशोक बाचकर, कॅशियर गणेश शेटे, सूर्यकांत कुंभार, विजयालक्ष्मी ताई   बाळासाहेब वाधवणे, विनोद घायतडक या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यमुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप व  पीएम  स्वनिधी योजनचे कर्ज वाटप शक्य झाले आहे  असे शाखा प्रबंधक संजय कराड यांनी सांगीतले
          चौकट
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. सुनिल वराट शेतकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी बँकेत हेलपाटे मारून दिले नाही सर्व कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी असणारी माणुसकी आपुलकी प्रेमाने सांगणे त्यामुळे शेतकऱ्यांची हेंडसाळ होत नाही .
   गोकुळ भस्मे छोटे व्यावसायिक
    कर्ज घेण्यासाठी  बँकेत अनेक फेऱ्या माराव्या लागतात मात्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये माझे पिएम स्वनिधि  प्रकरण ताबडतोप मंजुर करून लगेच  कर्ज वाटप केली. या बँकेच्या उपक्रमाचे अदर्श इतर बँकांनी घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here