गाव तेथे तालीम अभियान आवश्यक – अशोक डोंगरे

0
271
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – 
गावा – गावात चावडी आहे पण तालीम नाही गाव तेथे तालीम हवी हे अभियान झाले पाहिजे. जामखेड शहर नागपंचमीला नाचगाण्यासाठी प्रसिद्ध होते आता तालमीमुळे जामखेड शहराची ओळख हगाम्याचे वेगवेगळे फड गाजवणारे मल्ल म्हणून होऊ लागली आहे. आपण जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहोत पण आॅलपिक पदकात दुसरा क्रमांक येत नाही हे आपले दुर्दैव आहे.
   जामखेड येथे लोकसहभागातून सारोळा रोड वर साकारलेल्या  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना शुभारंभ , शस्त्रास्त्रांचे पुजन, सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी अर्जुनवीर पुरस्कार सन्मानित
काकासाहेब पवार, पृथ्वीराज पाटील, विशाल बनकर, सिकंदर शेख, आशोक शेठ डोंगरे, रमेश शेठ गुगळे, मंगेश (दादा) आजबे, डॉ गायकवाड, सुनील आबा उबाळे, मकरंद आबा काशिद, कृष्णाराजे चव्हाण, दादाराजे भोसले, बाळासाहेब ठाकरे, पवार साहेब, डॉ खोत सरपंच तरडगाव, केसकर आबा, काका चव्हाण, डॉ हजारे, मनोज कुलकर्णी, झेडे डॉ, राहुल पवार, आबा घुमरे, बंडु मुळे, मंगेश मुळे, योगेश मुळे, बालाजी जरे, कृष्णा डुचे यांच्या सह अनेक मल्ल व शेतकरी बांधव तसेच तरूण वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
  यावेळी जामखेड शहरात भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. यात मोठय़ा संख्येने युवा वर्ग होता.
   यावेळी बोलताना अशोक डोंगरे म्हणाले की, जामखेडची ओळख नाचगाणी म्हणून होती ती आता कुस्त्यांचे जंगी मैदान गाजवणारे मल्ल म्हणून होऊ लागली आहे.
यावेळी बोलताना अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार म्हणाले की, सध्याच्या काळात तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे त्यातून बाहेर पडून दंड बैठक यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पदक हवे असेल तर मेहनत महत्त्वाची आहे. मेहनत व सराव केला तरच फळ मिळणार आहे.
    यावेळी बोलताना उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, पैशांपेक्षा शरिरसंपत्ती महत्त्वाची आहे. सुदृढ शरिरयष्टी आवश्यक आहे.
    यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखान्याचे आयोजक मंगेश (दादा) आजबे म्हणाले की, जामखेड परिसरातील गोरगरीब मुलांना जिमची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने आम्ही स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा नावाने जिमखाना व कुस्तीच्या मॅटची  सोय केली आहे. ही सोय तालुक्यातील सर्व पैलवान मुलांना अतिशय गरजेची होती कारण कुस्ती स्पर्धा मध्ये मुलांना मॅटची सवय नसेल कारणाने आपली ग्रामीण भागातील पैलवान मुले चांगले कौशल्य असूनही शैक्षणिक किंवा इतर कुस्ती स्पर्धा मध्ये मागे राहत होती पण आता या  जिमखाना मुळे पैलवानांना या सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून तालीम मध्ये गोरगरीब व शेतकर्‍यांच्या मुलांना सर्व काही मोफत सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here