जयंती साजरी न केल्याने अधिकाऱ्याला फासले काळे

0
274
जामखेड न्युज – – – 
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मात्र
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील उपप्रदेशिक परिवाहन कार्यलयात जयंती साजरी न केल्याने तेथील
अधिकारी यांना आरपीआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली आहे.
१४ एप्रिल रोजी देशभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली मात्र श्रीरामपूर परिवहन कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही याच्या निषेधार्थ आर पी आय आठवले गटाच्या  कार्यकर्त्यांनी परिवाहन अधीकारी बच्छाव यांच्या अंगावर काळी शाई फेकून निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here