जामखेड न्युज – – – –
अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन मनिषा ने दहावी , बारावी व डि.एड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले होते.
मनिषा पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापिठ येथून पूर्ण केले असून पदवीत्तर पदवी शिक्षण पुणे विद्यापीठ पुणे येथे पूर्ण केले आहे. सोबतच तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून उत्तम अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न पाहिले.
तीची पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत निवड झालेली आहे.त्यामुळे परिसरातील लोक अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
नुकताच स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड येथे तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी तीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
आपल्या मनोगतात ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील संधी व फायदे याची जाणीव करून दिली. यश मिळवण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमुद केले.जामखेड तालुक्याचे नाव उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे असेही अवाहन केले.
यावेळी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रांचे संचालक प्रा.सोमनाथ शिंदे सर ,सुरेश वाघमारे सर बी.एस.शिंदे सर मयुर भोसले सर संभाजी देशमुख सर पत्रकार धनराज पवार उपस्थित होते.