शेतकरी विकास पॅनलचे बावी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व

0
419

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – – – –
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत बावी सेवा संस्थेच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील व माजी कृषी अधिकारी सुंदरददास बिरंगळ, सरपंच निलेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडीने. नऊ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विरोधी बळीराजा पॅनलने मोठा गाजावाजा केला होता पण अवघ्या चारच जागा जिंकता आल्या. शेतकरी विकास आघाडीने निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा केला.
    बावी सोसायटीत एकुण 534 मतदान होते. यापैकी 507 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता शेतकरी विकास पॅनल विरूद्ध बळीराजा पॅनल अशी लढत होती
शेतकरी विकास आघाडीने आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती तर बळीराजा पॅनलच्या बॅनरवरही आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांचे फोटो वापरले होते.
   शेतकरी विकास आघाडी आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली माजी कृषी अधिकारी सुंदरददास बिरंगळ, सरपंच निलेश पवार, उपसरपंच दादासाहेब मंडलिक, राम पवार, राहुल कवादे, लियाकत शेख, लालासाहेब पवार, शहाजी कवादे, मगनदास बिरंगळ, मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब पवार यांनी शेतकरी विकास आघाडी स्थापन करत दिमाखदार विजय संपादन केला.
     शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार सुंदरददास पांडुरंग बिरंगळ, दादासाहेब रावसाहेब पवार, सलमान दस्तगीर पठाण, संतोष चंद्रहास पवार, दादासाहेब वामन पवार, महादेव किसन शिंदे, विठ्ठल गोविंद कारंडे, विजुबाई सदाशिव पवार, जयश्री जगन्नाथ पवार
  तर बळीराजा पॅनलचे भागवत कारंडे, सुभाष कारंडे, केशव मुरुमकर, भिमराव निकत असे विजयी उमेदवार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here