आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू – अजित पवार

0
205
जामखेड न्युज – – – – 
राज्यात सध्या सगळीकडे एकच प्रकरण गाजतंय ते म्हणजे शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक आदोलन(St Workers Agitation) , यावर आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उलटू लागल्या आहेत. याच प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्तेंचे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर राष्ट्रवादीही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राज्यभर आदोलनं करत आहे. अशात राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कडकडीत इशारा दिला आहे. चिथावणी खोर भाषण कोण देतो हे सर्वांनी पाहिलंय आणि न्यायालयाच्या निकालाची तंतोतंत अंमलबजावणी होईल असं सरकारने सांगितले होतं, मग अचानक हे आंदोलन कसासाठी झालं? एवढं धाडसं येतं कुठून? या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधून काढू, असे म्हणत इशारा दिला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
पवार साहेबांच्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. एवढे मोठे धाडस करण्यामागे नक्की कोणतरी मास्टर माईंड असला पाहिजे. त्याला शोधून काढू. हे कुणाच्याच बाबतीत घडता कामा नये. याच्या शेवट पर्यंत जाऊन महाराष्ट्रात दूध का दूध पानी का पानी करू, असा थेट इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच हे पोलिसांचेही एकप्रकारे अपयश आहे. इतरांना याची माहिती असली पाहिजे. पोलीस यंत्रणेला याची माहिती असायला हवी होती. 12 तारखेला आंदोलन करणार असं काहीजण बोलेल होते, असे म्हणत त्यांनी पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही इशारा
याच आंदोलनावरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कडकडीत इशारा दिला आहे. राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here