ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न – महिलांची लक्षणीय उपस्थिती सविता बेदमुथ्था ठरल्या पैठणीच्या मानकरी

0
266
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – – 
जामखेड येथे ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या
खेळ पैठणीचा’ या होम मिनिस्टर स्पर्धेत सविता तुषार बेदमुथ्था या प्रथम विजेत्या ठरुन पैठणीच्या मानकरी ठरल्या तर व्दीतीय प्रियंका संकेत कोठारी व तृतीय क्रमांक राजश्री कीशोर टकले ह्या देखील पैठणीच्या मानकरी ठरल्या.
                      ADVERTISEMENT
ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल जामखेडच्या वतीने दि २० रोजी सायंकाळी होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. होम मिनिस्टर ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत ६० महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात कॉमेडीफेम कलाकार सुभाष यादव याने आपल्या विनोदी शैलीने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महीलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, सभापती राजश्रीताई मोरे, ऑक्सफोर्ड स्कूलच्या सेक्रेटरी सौ. वर्षा माने, चेअरमन प्रा. कैलास माने , प्राचार्य स्वाती कुरमुडे, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सलिम बागवान, नगरसेवक शामीर सय्यद, बिभिषण धनवडे, डॉ. अल्ताब शेख, नारायण राऊत, सलिम तांबोळी, प्रिन्सिपल अभिजित उगले , सिमा आहुजा आदी उपास्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना राजेंद्र दळवी यांनी सांगितले की महीला दिनाचे खुप कार्यक्रम पाहीले मात्र या कार्यक्रमात महीलांची लक्षणीय उपस्थिती होती हेच कार्यक्रमाचे यश आहे.
यानंतर सभापती राजश्रीताई सुर्यकांत मोरे म्हणाल्या की महीला दिनाचा कार्यक्रम शाळेने घेतला हे खुप कैतुकास्पद आहे या मुळे मुलांबरोबरच पालकांची देखील शाळेकडे येण्याची ओढ निर्माण होईल व शाळेचे व पालकांचे नाते आनखी जवळ येईल.
यानंतर जामखेडचे माजी सरपंच कैलास माने यांनी सांगितले की महीला व पालकांच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती दाखवली या मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला तसेच महीलांनी व पालकांनी या सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले त्या बद्दल त्यांचे कौतुक करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा आहुजा तर अभार अभिजित उगले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here