जामखेड न्युज – – – –
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश वराट तर उपाध्यक्षपदी दिलीप मुरूमकर यांनी पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी गणेश वराट व दिलीप मुरूमकर यांचा यावेळी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश वराट, दिलीप मुरूमकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब वराट, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ वराट, सोसायटी सदस्य युवराज वराट, नवनाथ बहिर सर, विकास भोरे, प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे, रजनीकांत साखरे, शिवाजी मिसाळ, तय्यब शेख, श्रीमती भोसले मॅडम, श्रीमती खंडागळे मॅडम, शिवाजी वराट, विष्णु लहाने, नानासाहेब लहाने, भाऊसाहेब लहाने, महादेव मुरुमकर यांच्या सह अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे यांनी तर आभार रजनीकांत साखरे यांनी मानले