जामखेड न्युज – – –
गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एकीकडे रशियाने या युद्धात आपली संपूर्ण ताकद लावून दिली आहे. तर, दुसरीकडे युक्रेनही आपल्या नागरिकांसह पूर्ण हिंमतीने रशियाचे वार परतवून लावत आहे.
या युद्धादरम्यान अशाही बातम्या समोर आल्या आहेत की, युक्रेनचे नागरिक रशियन सैन्याचं सामान लुटून त्याचा वापर करत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये खारकीव येथील एका शेतकऱ्याने रशियन सैन्याचा टँकच चोरी केला आणि बर्फात त्याच्या सवारीचा आनंद घेतला.
आता अशीच एक बातमी समोर आली आहे. युक्रेनमधील एक शेतकरी युद्ध सुरू असताना जंगलात गेला होता. तेथे त्याला एक रशियन युद्धनौका दिसली. या युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र डागलं जाऊ शकतं. दरम्यान या युद्धनौकेला कुणीही वाली नसल्याचं बघत शेतकऱ्याने त्यावर कब्जा केला. इतकच नाही तर तो युद्धनौकेला घरी सुद्धा घेऊन आला.
दरम्यान या शेतकऱ्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या युद्धनौकेची किंती तब्बल 15 अब्ज असल्याने सदरील शेतकरी आता अब्जाधीश बनला आहे. सोशल मीडिया साइट ट्विटरवर या शेतकऱ्याबद्दल ओरिक्स नावाच्या पेजवर शेअर केलं गेलं आहे. या बातमीबद्दल ट्विट करून सांगण्यात आलं आहे.
ज्या शेतकऱ्याला ही युद्धनौका मिळाली त्याचं नाव इगोर असं सांगण्यात आलं आहे. इगोर रोज सकाळी जंगलात फिरायला जातो. आज सकाळी तो बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत रशियन लष्कराचे 9K330 Tor SAM होतं. त्याला हे लष्करी टँक जंगलात सापडलं आणि आता इगोर या 15 अब्ज युद्धनौकेचा मालक आहे.