जामखेड न्युज – – – –
जामखेड मागील पाच वर्षाच्या काळात तात्कालिक जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मोठय़ा प्रमाणावर निधी जामखेड साठी आणला काही कामे मार्गी लागली थोडेफार कामे राहिले असतील ती माझी जबाबदारी आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणावर निधी देतात पण ग्रामीण भागातील रस्त्याला कमी निधी देतात. नियोजन मंडळातून जो काही निधी मिळेल तो देण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
तालुक्यातील अरणगाव ते नन्नवरेवस्ती वंजारवाडी या ५०० मीटर रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून २५ लाख रुपये निधी खा. सुजय विखे यांनी मिळवून दिला त्याचे भुमीपुजन विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे, उद्योजक राजेंद्र ननवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश कांबळे, शाखा अभियंता लाड, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, उद्धव हुलगुंडे, बाजार समितीचे संचालक करण ढवळे, अरणगावचे सरपंच लहु शिंदे, जयहरी जायभाय, प्रा. अरुण वराट, अरूण म्हस्के, सलीम बागवान सह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे उपसभापती अंकुशराव ढवळे म्हणाले, अरणगाव ते वंजारवाडी हा रस्ता खूप खराब झाला होता या पंचक्रोशीतील लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने रस्ता होणे गरजेचे होते. खासदार सुजय विखे पा. यांच्याकडे या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला त्याची दखल खासदार साहेबांनी घेऊन जिल्हा नियोजन मंडळातून २५ लाख तरतूद करुन सुरवातीला ५०० मिटर रस्ता हाती घेतला आहे. उर्वरित रस्त्यासाठी असाच निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे पाटील यांनी सांगितले.





