जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील भुमिला इतिहासात एक अनन्यसाधारण महत्व आहे. जामखेड तालुक्यातील किल्ले शिवपट्टन व रणटेकडी या भुमिवरती इतीहासात एक सुवर्ण पान लिहीले गेले आहे. ही भूमी मराठ्यांच्या शौर्याची, पराक्रमाची, धैर्याची साक्ष देणारे एक शक्ती स्थळ आहे. परंतु शोकांतिका ही आहे की या शक्ती स्थळाचा इतिहास व हे स्थळ आजपर्यंत कायम दुर्लक्षीत राहीले. या शक्ती स्थळाच वैभव टिकून राहवे व हा गौरवशाली ईतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी व श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी नेहमी अग्रेसर असतात किल्ले शिवपट्टन व रणटेकडी या ठिकाणी वर्षातुन सतत स्वच्छता मोहिम, डागडुजी, मशाल महोत्सव, शौर्यदिन तसेच चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर वाडा या ठिकाणी वर्षभर सतत कार्यक्रम घेऊन तरुणांना इतिहासाची माहिती देऊन दिशा देण्याचे काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडुन केले जाते.
दोन वर्षापूर्वी खर्डा किल्याचे काम चालु असताना बुरूजा जवळील खोदकामात जवळ पास २५० तोफगोळे मिळुन आले ते तेव्हा पासुन किल्याच्या आवारात पडुन होते त्याचे संवर्धन व्हावे व पुढील पिढीला व सर्व शिवप्रेमींना आपल्या पुर्वजांचा ईतिहास बघता यावा म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने किल्याच्या आतमध्ये गेट बसवुन त्यामध्ये सर्व तोफगोळे संग्रहीत करून ठेवण्यात आले अाहेत. तसेच या अगोदर श्री शिवप्रतिष्ठान या संघटनेच्या मार्फत किल्याचे प्रवेशद्वार बसवण्यात आले तसेच किल्याच्या बुरुजावरील ४०० किलो वजनाचा तोफगाडा, किल्यावरील भगवा ध्वज, माहिती फलक या प्रकारे आपला ईतीहास जतन व संवर्धनाचे कार्य श्री शिवप्रतिष्ठान कडुन चालु आहे.
इतिहासात खर्ड्याच्या लढाईची दखल घेतली आहे. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई आहे या लढाईत ही रणटेकडी महत्त्वाचा दुवा ठरला आहे. खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी – मार्च इ.स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील दौंडवाडी रनटेकडी या पवित्र युध्द भुमिवरती झालेली ही एक लढाई होती या युध्दात मराठ्यांनी विजय मिळवला म्हणून या लढाईला मराठ्यांची शेवटची विजयी लढाई देखील मनले जाते.
जामखेड पासून ३२ कि.मी. व खर्डा या गावापासून १० कि. मी अंतरावर दौंडवाडी येथे ही रणटेकडी आहे. संपुर्ण मराठेशाहीची अस्मिता असलेल्या या पवित्र रनटेकडी युध्द भुमिवर ईतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी पान लिहीले गेले आहे. २२५ वर्षापुर्वी येणारा शत्रू किती लांब आहे व त्याला नामोहरण कसे करता येईल यादृष्टीने मराठ्यांनी जामखेड तालुक्यातील दौमडवाडी येथील ही पवित्र युध्दभूमी रणटेकडीचा आधार घेऊन ११ मार्च १७९५ चे युध्द जिंकले आहे. याबाबत इतिहासात नोंद असून त्या परिसराचा विकास करण्यासाठी याकडे आजपर्यंत पुरातत्त्व विभाग, सर्व राजकारण्यांनी व इतिहास प्रेमींनी दुर्लक्ष केले आहे. या रणटेकडीवरील आठवणी जागविण्यासाठी व या रणटेकडी चा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या विचाराने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडचे श्री पांडुराजे भोसले व सर्व धारकरी व शिवभक्त यांनी या रणटेकडी वरती ३० फुट उंचीचा विजयीस्तंभ उभारून त्यावर भगवा झेंडा फडकावला व जवळच३०० किलो वजनाची लोखंडी तोफची प्रतिकृती तयार करून त्यावर शिलालेख बसवला आहे. दरवर्षी ११ मार्च हा मराठा शौर्यदिन किल्यात व या रणटेकडीवर साजरा केला जातो शेकडो धारकरी शिवप्रेमी याठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात. एवढे महत्व या रणटेकडी बाबत असून शोकांतिका ही आहे की या युध्द भुमिचा कोणत्याही सरकारने किंवा आमदार, खासदाराने याचा कसलाही विकास केलेला नाही. या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ता देखील अस्तीत्वात नाही. असे पांडुराजे भोसले यांनी बोलताना सांगितले.
सालाबादप्रमाणे ११ मार्च २०२२ या ही वर्षी शेकडो शिवप्रेमीच्या उपस्थितीत किल्ल्यावर मोठ्या उत्साहात हा शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी संकेत सातपुते, बबलु निकम, गणेश जोशी, जगन्नाथ म्हेत्रे, नाना खंडागळे, नाना पवार, शिवराज विटकर, अशोक पोटफोडे तसेच