उद्यापासून लालपरी धावणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

0
213
जामखेड न्युज – – – – 
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण सदृश्य लाभ देण्यास राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे. आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या एकूण 18 मागण्यांवर चर्चा झाली. त्यातील 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे. सातवा वेतन आयोग हा तात्काळ लागू करायचा की तीन महिन्यांनी करायचा यावर परिवहन विभागाचा अभ्यास सुरू आहे. इतकच नाही तर, संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब हे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर अनिल परब याबाबतची घोषणा विधानसभेत करणार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटीचे विलीनीकरण झाल्यावर जे लाभ द्यायचे आहेत, ते विलीनीकरण सदृश्य लाभ एसटी कामगारांना देण्यात येणार आहे. याबाबत उद्या राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार आहे. असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here