जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल मयुर शेंबडे व सुमित फलके या दोन विद्यार्थ्यांची क्रियेसेन्ट युनिव्हर्सिटी चेन्नई या ठिकाणी होणाऱ्या आंतरविद्यापीठ बाॅलबॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड येथिल दोन विद्यार्थ्यांची चेन्नई येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ बाॅलबॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ. सुनील नरके, माजी प्राचार्य अविनाश फलके, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. मधुकर राळेभात सह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मित्र मंडळींनी मयुर व सुमित यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जामखेड महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा कायमच निर्माण केला आहे.





