राज्यस्तरीय अॅबेकस आॅनलाईन स्पर्धेत वराट भगिनींचा डंका – सानिका वराट प्रथम तर वैष्णवी वराट हिस बेस्ट मेडल मधे दुसरी

0
320
जामखेड प्रतिनिधी 

                 जामखेड न्युज – – – –

राज्यस्तरीय अॅबेकस आॅनलाईन स्पर्धेत वराट भगिनींनी  यश मिळवत अॅबेकस स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. सानिका भागवत वराट हिने स्माॅल फ्रेंड सेकंडरी ( एस एफ एस) या लेव्हल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर वैष्णवी वराटने न्यू कमर्स किड (एन सी के) प्रकारात बेस्ट पारितोषिक पटकावले आहे. याबद्दल वराट भगिनींवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
    कु. सानिका भागवत वराट ही राज्यस्तरीय अॅबेकस आॅनलाईन स्पर्धेतील स्माॅल फ्रेंड सेकंडरी ( एस एफ एस) या लेव्हल मध्ये ७१ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर वैष्णवी भागवत वराट न्यू कमर्स किड (एन सी के) प्रकारात ७५ गुण मिळवून बेस्ट पारितोषिक पटकावले या स्पर्धेतील यशवंतांचा गुणगौरव सोहळा पुणे येथे संपन्न झाला.
    सानिका वराट व वैष्णवी वराट यांना सारिका वारे मॅडम तसेच वडिल प्रा. भागवत वराट व आई रेखा वराट यांचे मार्गदर्शन लाभले. 
      वराट भगिनींच्या यशाबद्दल केएसके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपाताई क्षीरसागर, वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे सह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट सर, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सर, शिवाजी सुळे सर, महादेव वराट सर, विस्तार अधिकारी रामचंद्र सुळे साहेब यांच्या सह साकत, जामखेड, पाटोदा परिसरातील अनेकांनी या भगिनींचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here