जामखेड न्युज – – – –
सहकाराला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सहकार सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सहकार संस्था सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे असे मत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी आपल्या अनेक समर्थकांसह दिनांक ०५/०३/२०२२ रोजी शनिवारी पुणे येथे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब व कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार श्री. रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही प्रवेश का केला, वास्तविक परिस्थिती पाहता गेली अनेक महिने रोहित दादा यांच्या विकासात्मक कामाची पद्धत आणि त्यासाठी लागणारा पाठपुरावा आणि सामान्य माणसाला न्याय देण्याची असलेली तळमळ पाहता दादांच्या नेतृत्वात काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
यावेळी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की, माझे वडील सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांनी राजकारणातील संपूर्ण हयात ही शेतकरी, शेतमजूर आणि समाजातील शेवटच्या घटकाला लाभ कसा होईल व त्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी घातली आणि सहकाराच्या माध्यमातून गेली २५ वर्षे त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तोच कामाचा वारसा आम्हाला पुढे चालू ठेवायचा आहे. माझ्या वडिलांनी सहकार तालुक्यात वाढवला आणि आता त्यांच्या आशीर्वादाने आणि आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाने सहकार आणखी उंचीवर न्यायचा आहे. सहकाराच्या माध्यमातून संस्थेचे सशक्तीकरण होवून त्याचा फायदा हा समाजातील सगळ्या घटकांना करून द्यायचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मी आणि माझ्या बंधूने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की, १९९७ रोजी वडिल जगन्नाथ राळेभात जिल्हा बँकेचे संचालक झाले यावेळी तालुक्याचे कर्जवाटप दोन कोटी होते आज ते १२९ कोटीवर आहे. आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांचा विचार केला आहे व आणी येथून पुढेही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
चौकट
आतापर्यंत आम्ही तालुक्यात विखे गट म्हणून परिचित होतो आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी विखे कुटुंबियांशी जे कौटुंबिक संबध होते ते तसेच राहतिल.
चौकट
पाच वर्षांत त्या खात्याचे मंत्री आपले पालकमंत्री आसतानाही जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत कसलीही सुधारणा झाली नाही. सध्या अडचणी आहेत आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सुधीर राळेभात यांनी सांगितले.