भन्नाट लव्हस्टोरी!!! तृतीयपंथी सपना उद्या बीडमधील बाळूशी अडकणार विवाहबंधनात

0
300
जामखेड न्युज – – – – 
अन् तृतीयपंथी सपनाला हळद लागली! बीडमधील बाळूशी उद्या लगीनगाठ, भन्नाट लव्हस्टोरी… उद्या सोमवारी तृतीयपंथी असलेल्या सपनाचा बाळू सोबतचा विवाह बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणार आहे. किन्नर सपना आणि नवरदेव बाळू यांच्या हळदीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी नाळवंडी नाका पेठबीड भागात धार्मिक परंपरेनुसार साजरा झाला.
तृतीयपंथी सौ शिवलक्ष्मी यांच्या उपस्थितीत किन्नर सपना आणि बाळूचा विवाह होणार आहे. मनमाडच्या तृतीयपंथी सौ.शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांच्यासह त्यांचे पती संजय झाल्टे उपस्थित राहणार आहेत.
किन्नर आखाडाचे महाराष्ट्र व्यवस्थापन प्रमुख श्रीमंत ऋषिकेश महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात पहिल्या तृतीयपंथी विवाहाला अनेकजण उपस्थित असतील.
किन्नर आखाडाचे महाराष्ट्र व्यवस्थापन प्रमुख श्रीमंत ऋषिकेश महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात पहिल्या तृतीयपंथी विवाहाला अनेकजण उपस्थित असतील. या अनोख्या विवाहाची जिल्हाभर नव्हे तर राज्यात चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here