आमदार रोहित पवार यांच्या हस्ते 151 बचतगटांना 1 कोटी 50 लाखांचे कर्ज वाटप

0
256
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील 151 बचतगटांना 1 कोटी 50 लाख रूपयांच्या कर्जाचे वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 151 बचत गटातील प्रत्येकी 10 महिला अशा जवळपास 1500 महिलांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. याबरोबरच खादी व ग्रामोद्योग आयोग व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेतर्फे 70 महिलांना पायाने चालवता येणाऱ्या अगरबत्ती बनवण्याच्या मशीन वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला. या वेळी महिलांना मशीन्सबरोबरच प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.
एकूण तीन दिवसीय आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी बचतगटांच्या महिलांना उपयुक्त असणाऱ्या मशिनरीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बचत गटातील महिलांना आमदार रोहित पवार व त्यांच्या आई सुनंदाताई पवार यांच्या हस्ते कर्जाचे वाटप करण्यात आले. याबरोबरच अगरबत्ती बनवण्याचे मशीनही वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवशी म्हणजेच महिलादिनी कर्जत जामखेड मतदारसंघातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 31 महिलांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे. अशा कार्यक्रमांमुळे महिला सक्षम होण्यास मदत होईल यासोबतच त्यांना कुणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.
आमदार रोहित पवार हे मतदारसंघात विविध प्रकारची शिबिरे व कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या सोयीसाठी सदैव प्रयत्न करत असतात. त्यानुसारच यावेळीही त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here